भजनी मालिका
← भजनांकडे परत

रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका

ramesah pandhari ala | yeuni bhetala pundalika

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रमेसह पंढरी आला । येऊनि भेटला पुंडलिका ॥१॥ म्हणे उभारुनि बाह्मा हात । तरतील नामें महापतित ॥२॥ नका कांहीं आटाआटी । योग यागांची कसवटी ॥३॥ ब्रह्माज्ञान नसाधे लोकां । मुखीं घोका विठ्ठला ॥४॥ शरण एका जनार्दनीं । सांगे वचनीं पुंडलीक ॥५॥