भजनी मालिका
← भजनांकडे परत

रवितेजकिरण फ़ांकलिया तेज

ravitejakiran फ़ankaliya tej

रवितेजकिरण फ़ांकलिया तेज । उडेरे सहज तिमिर रया ॥१॥ तैसा तूं गभस्ति निवृत्ति उदारा । उगवोनि चराचरा तेज केलें ॥२॥ तेजीं तेज दिसे अव्यक्ताचा ठसा । उमजोनि प्रकाशा न मोडे तुझा ॥३॥ चंद्रोदयीं कमळें प्रकासिलितें । तैसें तुझें भरतें करी आह्मां ॥४॥ वृत्तीची निवृत्ति देखिली म्यां तुझी । हरपली माझी चित्तवृत्ति ॥५॥ ज्ञान ऐसें नांव ज्ञानदेवा देसी । शेखी तुवां रुपासी मेळविलें ॥६॥