भजनी मालिका

भजने

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥ मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मौन कां धरिले विश्वाच्या । जीवना उत्तर वचना देई माझ्या ॥१॥ तूं माझे संचित तूंचि पूर्वपुण्य । तूं माझे प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मौनचि आला मौनचि आला । मौन्य उभा ठेला विटेवरी ॥१॥ मौन्याचि ध्यान गोजिरें गोमटें । मौन्यचि ठेविले विटे समपद ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

म्यां गुरु केला म्यां गुरु केला । सर्व बोध तेणें मज दिधला ॥१॥ घालुनियां भक्ति अंजन । दावियेलें विठ्ठलनिधान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

म्हणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥१॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणऊनि काकुळती । येतों पुढत पुढती । तुमचिया असे हातीं । कमळापती भांडार ॥१॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगेची उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

म्हणतां नाम वाचे वैकुंठ जवळी । नित्य वनमाळी भक्तांसंगें ॥१॥ होईल साधन विठठलीं परिपूर्ण । निवती नयन मूर्ति पाहतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

म्हणतां वाचे वंदी तया यम । काळादिकांसम तुज एका ॥१॥ ऋद्धि सिद्धि दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव