भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली

mhanauni khel mandiyela aisa | nahin koni disha varjiyeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥१॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥ तुका म्हणे नाहीं काळापाशीं गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥३॥