भजनी मालिका

भजने

महा मात्रा हरीचे नाम । तरती अधमादि अधम । हाचि कालिमाजीं धर्म । नामापरते न देखें ॥१॥ जगीं नाम तारक नौका । आन उपाय नाहीं देखां । साधन साधितां साधकां । नामापरते थोर नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचें तारक । उपमेसि आणीक नाही दुजें ॥१॥ तें हें पंढरपूर प्रेमाचें भांडार । नामें निरंतर गर्जतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥ मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महाकारण जें देहज्ञान । त्याचाही साक्षी आत्मा आपण । जैसा सेजे ये आंबा मुरोन । तैसा तो जाण ॥१॥ ऐशीं मुराली तुर्या अवस्था । मग साक्षी जाला परौता । तो मुरोनि वस्तुता । वस्तु जाला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

महादेव नाम वदे नित्य मुखें । तेथें सर्व सुखें वसताती ॥१॥ शिवनामें कामक्रोधाचे दहन । त्रिविध ताप शमन पावताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥ म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

महापुरी जैसें वहातें उदक । मध्य ती तारक नौका जैशी ॥१॥ तैसें प्राणियासी नाम हें तारक । भव सिंधु धाक नुरे नामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

महासुखा पारणें होये । आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥ ऐशिया पावविलों विश्रांती । निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महिमा अगाध यात्रा कार्तिकीये । आला पंढरीये नामदेव ॥१॥ भक्त शिरोमणी पंढरीच्या नाथा । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

महिमा अदभूतची पाहतां । चरणीं उध्दार झाला पतिता ॥१॥ आहिल्या शिळा झाली शापें । चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

महिमा याचा चतुर्मुखा । न करवेचि लेखा वर्णितां ॥१॥ सनकादिकाहि नित्य येती । पूजा करिती देवभक्ता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माई मोरे घर आयो शामछे । गावढी छोरी मारे मनछे ॥१॥ दधीं दूध माखन चुरावें हमछे । छोकारीया खिलावन देवछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राण प्रीती ॥१॥ ऐसी बळिवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम