भजनी मालिका
← भजनांकडे परत

महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे

maharasi sive | kope bramhan to navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥ ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥