भजनी मालिका
← भजनांकडे परत

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु

maha vairi nirdalila | pail vatsasur nivatila | mhanati achoj ha baliya jhala | nandarayacha kumaru

रचनाकार: संत निळोबा · अभंग
महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥ मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥ जो तो जाउनी घातचि पावे । नये परतोनियां जीवें । यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥३॥ तंव तो उठोनी अघासुर । करी रायासी जोहार । म्हणे न व्हावें चिंतातुर । विदया अपार मजपाशीं ॥४॥ राया तुझिया हितावरी । करीन गोकुळाची बोहरी । अवघेचि घालूनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥५॥ ऐसें तोषवूनियां राया । म्हणे गर्वारुढ । यावरी होऊनिया मूढ । काळासवें मांडूनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥७॥