भजनी मालिका

भजने

पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥ धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥ काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥ शास्त्रही पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥ध्रु.॥ कर्मअभिमानें वर्ण अभिमानें । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पंडितांच्या वचना द्यावें अनुमोदन । परि होत नोहे जाण तेणें कांहीं ॥१॥ शास्त्रीयाचे वचना द्यावें अनुमोदन । परि हित नोहे जाण तेणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पडियेली जेव्हां यशोदेसी भ्रांती । ऐकें परीक्षिती प्रेम तिचें ॥१॥ खोडी नको करूं ह्मणे दटाविलें । ह्मणोनि रुसलें तान्हें माझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पडे आतां दिवसरातीं । विसर तुमचा श्रीपती । झाली इंद्रियां विश्रांति । रंगलीं नामचिंतनें ॥१॥ वदनीं सुंदर तुमचें नाम । डोळिया रुप मेघश्याम । श्रावणीं ऐकतां उत्तम । गुण तुमचे गोविंदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पडे प्रायश्चित्त बोलों नका कोणी । ऐकूं नये कानीं शब्द यांचा ॥१॥ स्वर्गसुखासाठीं करिताति यज्ञ । टाकिती अवदान अग्निमुखीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥ भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

पंढरपुरी गेले प्रार्थीले वीला चिदंबर कोण सांगे मला ।।१।। रात्री हो द्रष्टांती विठ्ठल सांगती रूप होवोनी बोलती चिदंबराचे ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं । मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥ तेथें देव येथें भक्त । महिमा अदभुत दोहींचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा