भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे

padalen mayavartin shudhdi nahin jaya | mhanoni avatar tayan dharanen lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥ धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥ केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनियां ॥३॥ नेणती जाणती पडलीं जीं भुलीं । तयां शुध्दि केली त्रिअक्षरीं ॥४॥ एका जनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥