भजनी मालिका
← भजनांकडे परत

युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची

yukti tanv jhalya kunthit sakala | urali he kala jivanachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहींचि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥ तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलोसे ॥३॥