भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी

yeuni sansarin | mi ton ek janen hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥ तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥