भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा

yeuni jauni pahen tujakade | padilya sankaden narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरी भार जीवें भावें ॥ध्रु.॥ निष्ठुर अथवा होई तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥ आपुलें वचन राहावें सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाड ॥३॥ ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईंल तयाकडे ॥४॥ तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥