भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरी म्हणे मज काय देतां स्वामी

yeri mhane maj kay detan svami

रचनाकार: संत बंका · अभंग
येरी म्हणे मज काय देतां स्वामी । उच्छिष्टांचे आम्ही धणी असों ॥१॥ तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा । तोचि प्रिय देवा आहे आम्हां ॥२॥ येरु म्हणे घास घेई माझा करीं । मूल तें निर्धारीं होइल तुज ॥३॥ ऐकतां आनंदे घाली लोटांगण । वंदिले चरण जीवेंभावें ॥४॥ वंका म्हणे ऐसें लाघव करोनी । गेलासे निघोनी चक्रपाणी ॥५॥