भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम

yenen mukhen tujhe varni gun nam

येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥ डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां सुख॥३॥ तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥