भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे

yenechi ashramen nityanaimityen karme

येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे । वर्णाश्रमधर्म त्यागून कोठें जासी । म्हणोनि येकचि विदारी बापा । जेणें सार्थक होय संसारासी । विकल्प नको धरुं । अंतर धरुनि राहे या सगुणासी रया ॥१॥ आवडी धरुनी गोडी घेई का ध्यानीं । परतोन मग योनि नाहीं तूज ॥२॥ सांडी सांडी त्याग नास्तिकाचे मस्त नलगे करणें अटणें । नानाविधि वाउगे जड कां सिणवणें । केंविं मन होय शुध्दी । एकलेंचि मन करुनि स्वाधीन । सगुणींचि काय सिध्दि नलभे रया ॥३॥ म्हणोनि येकाकारवृत्ति सगुणीं बैसली । प्रीतिचि निर्गुणीचि आर्ति जाण संपदा । याची सांडि मांडी न करी । निरुतें चित्तीं धरी । स्वस्वरुपीं असे सदा बापरखुमदेविवरुविठ्ठलु चिंतितां सुख सगुणींची जोडे आनंदु रया ॥४॥