भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणे जाणें दोनी खुंटले मारग

yene janen doni khuntale marag

रचनाकार: संत बंका · अभंग
येणे जाणें दोनी खुंटले मारग । अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥ एक धरिला मनीं पंढरीचा राणा । वेदशास्त्र पुराण अकळ तो ॥२॥ आगमनाची आटी निगमा नकळे । बहुत शीणले वाखाणितां ॥३॥ वंका म्हणे तो हा पहा विटेवरी । पाउलें गोजिंरी कर कटी ॥४॥