भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया

yeil ten ghein bhaga | navhe joga dusariya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येईल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥ मज घेती डांगवरी । सवें हरी नसलिया ॥२॥ तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥