भजनी मालिका
← भजनांकडे परत

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु

ye saten aliya volanga sarangadharu

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥ कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत । मृगजळवत जाईल रया ॥२॥ विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली । अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥ ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें । स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥