भजनी मालिका
← भजनांकडे परत

यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील

yathartha vad sanduni upachar | bolati te aghor bhogitil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥ चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥ तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥