भजनी मालिका
← भजनांकडे परत

यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक

yasi koni mhane nindechin uttaren | nagavala kharen tochi ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥१॥ आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥ नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥ जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥ तुका म्हणे निंब दिधल्यावांचून । अंतरींचा शीण कैसा जाय ॥४॥