भजनी मालिका
← भजनांकडे परत

यम नियम पाप पुण्य आम्हासी

yam niyam pap punya amhasi

यम नियम पाप पुण्य आम्हासी । आपण भलतेंचि करिसी । तुझिया थोरपण बिहुनी असावें कवणें शंकावें रायासी । प्रत्यक्ष जगी बाटली नारी तिचें स्मरण लोकांसी । पुराणी डांगोरा पिटिताति हें पतिव्रतापण तयेसी रया ॥१॥ आवडे तें करिसी देवा कवण करी तुझा हेवारे ॥ध्रु०॥ बहुता परी उणें ऐकिजे पांडवा सांगो या गोष्ठी । पांचांपासुनि जन्मले पांचैजण येक पत्नीच्या पोटीं । गोत्रवधु करुनि राज्य करिती विश्वास वंद्य शेवटीं । जन्मेजया ऐसें बोलिला सत्य तो पापिया जाला कुष्टी ॥२॥ प्राण जाई तंव बोलिल तुज । पतन तया दशरथा । गणिका एक पाखिरु पोखिलें होतें पाचारिलें प्राण जातां । कीं तयेसी ऊर्ध्वगति ऐसीं बोलती पुराणें कासया न मिळे पाहतां । बोलणें खुंटलें तुजपासी देवा वेव्हारु नाहीं सर्वथा ॥३॥ तपाचा जो राशी पुण्यपणें थोर । तीर्थरुप सर्वां तीर्थमंत्राचा अवतार । देव आणि शक्ती सूर्य तैसा विचारितां । तो मांडव्य ऋषि वाहिला सुळीं येक ऊजाला वधिता । पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें तो वैकुंठी आजामेळु सरतारे रे ॥४॥ यज्ञमुखीं अवदानें देति त्या करिसी वांकडें तोंड । लोणी चोरावया जासी घरोघरीं उघडिसी त्यांची कवाडें । छप्पन कोटि यादव संगती हे तुझे ते त्वां केले शापावरपडे । कोळियानें तुज विंधिलें पायीं । त्यासी सायुज्यता कोडें रया ॥५॥ अष्टांगयोगे शरीर दंडिले तुजलागीं जालीं पिसी । पुत्रदारा धन सांडूनियां जन हिंडताती वनवासी । गाती वाती पूजिती तूतें त्यांसि निजपद सायासीं । विष पाजूं आली पूतना राक्षसी सायुज्यता देणें तियेसी रया ॥६॥ वारया मोट बांधेल कोण आकाशासी कुंप कायसा । सूर्यापुढें दिवा लाऊनिया चालणें वाऊगाची शिण जैसा । विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी । सर्वेशा ज्ञानदेव म्हणे देवादिदेवा । जन भांबांविला ऐशा मावा रया ॥७॥