भजनी मालिका
← भजनांकडे परत

यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ

yalagin avadi mhana ram krushna | joda narayan sarvakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥ध्रु.॥ न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥ न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरी ॥३॥ तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । डोले नारायण नामासाठी ॥४॥