भजनी मालिका
← भजनांकडे परत

याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा

yajasathin vanantara | jaton sanduniyan ghara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥ माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥ तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥