भजनी मालिका
← भजनांकडे परत

याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति

yajasathin bhakti | jagin rudhavavaya khyati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥ गौरव यासाठी । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥ तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥