भजनी मालिका
← भजनांकडे परत

यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान

yadnya bhutanchya palana | bhed karya karana | pavavaya upasana | bramhasthanin prasthan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥ एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥ आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥ तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥