भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें

yachiya chhanda je lagale prani | tyachi dhuladhani keli yenen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥ याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥ स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा । किती फजीतखोरा बुझवावें ॥३॥ न जावें तेथें हाटेची जाय । करूं नये तें करीं स्वयें न धरीं कांही ॥४॥ चोखा म्हणे तुज तुझीच आण । होई समाधान घटिकाभरी ॥५॥