भजनी मालिका
← भजनांकडे परत

याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा

yachi save lagali jiva | godi heva sangacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संडे ॥२॥ तुका म्हणे चक्रचाळे । वेड बळें लाविलें॥३॥