भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे नाचों अवघेजण । भावें आनंदे करून

ya re nachon avaghejan | bhaven anande karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या रे नाचों अवघेजण । भावें आनंदे करून ॥१॥ गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊन संतजना ॥ध्रु.॥ सुख फुका साठी । साधे हरीनाम बोभाटीं ॥२॥ प्रेमासाठी तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥ पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥ तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥