भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे हरीदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें

ya re haridasano jinkon kalikala | amuchiya bala pudhen kiti bapuden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या रे हरीदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें नामाचि आवडी ॥ध्रु.॥ येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥ वांकडएा माना बोल बोलावे आर्ष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥ आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥ तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक॥५॥