भजनी मालिका
← भजनांकडे परत

या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं अपुलिया हिता

ya re gade ho dharun ghai janatan hi nenatan | nam gaun tali vahun apuliya hita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं अपुलिया हिता ॥१॥ फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥ हिंडती रानोरान भुजंग ते कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥