भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यर्थ प्रपंच टवाळ

vyartha prapanch taval

व्यर्थ प्रपंच टवाळ । सार एक निर्मळ कृपा करी हरि कृपाळ । दीन दयाळ हरी माझा ॥१॥ क्षमा शांति दया रुपी । तोचि तरेल स्वरुपीं । नामें तरलें महापापी । ऐसा ब्रह्मा बोलिला ॥२॥ गीतेमाजी अर्जुनाशीं हरी सांगे साक्षी जैशी । जो रत होतसे हरिभक्ताशी । तो नेमेशी तरेल ॥३॥ ज्ञानदेव भाष्यें केले । गीता ज्ञान विस्तारलें । भक्ति भाग्यवंती घेतलें । भाष्येंकरुनी गीतेच्या ॥४॥