भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा

vyapak vyapala tinhin tribhuvanin | chari varna bani vithu majha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥ पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥ षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥