भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी

vyapak ha vishvambhar | charachar jyacheni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी ॥१॥ पंढरिराय विटेवरी । त्याचि धरीं पाउलें ॥ध्रु.॥ अवघियांचा हाचि ठाव । देवीदेव सकळ ॥२॥ तुका म्हणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥