भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता

vyaktavyakta dithi ghaluni kalpanta

व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता कल्पना नुरोचि तेथें आतां ॥१॥ पाहाणियाचा प्रपंचु पाहता । निमाला कवणा बोलु ठेऊं आतां ॥२॥ दुजें ह्मणो जाय तंव मी माजी हारपे । नवर्णवे तुझी सत्ता रया ॥ गोडियेचें गोडपण गोडि केविं मिरवे । तुजमाजी असतां ते वेगळीक रया ॥३॥ निशीं जागरणीं निमाला कीं तंतुचि तंतीं आटला । रसीं रसु दुणावला तुझ्या ठाई ॥४॥ तेथें कल्पनेसि मूळ विरोनियां पाल्हाळ । तैसें उभय संदीं तूं विदेहीरया ॥५॥ या लागीं बापरखुमादेविवरु विठ्ठलु उदारु दिठीचे दिठीं माजी अंजन । सुखीं सुख दुणावलें चौघा पडिले मौन्य । येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनियां सकळ । डोळ्यांविण दिठी प्रबळ रया ॥६॥