भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यक्ताचे अव्यक्ती पाहतां पैं

vyaktache avyakti pahatan pain

व्यक्ताचे अव्यक्ती पाहतां पैं न दिसे आपीआप रसे व्यक्त हरि ॥१॥ बाहेजु भीतरी आदिमध्यउर्ध्व । ह्रदयीं सन्नद्व बिंबलासे ॥२॥ ऐसीये दशे ते अव्यक्त भुंजसी । मी माझे मोहासी सांडी रया ॥३॥ बापरखुमादेविवर अव्यक्त व्यक्ती अव्यक्त । अवघे संचित हरि आहे ॥४॥