भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती

vruksha valli amhan soyarin vanacharen | pakshi hi susvaren alaviti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ आकाश मंडप पृथीवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु॥३॥ हरीकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥ तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥