भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं

vonavya sonkarin | set khadalen pankharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥२॥ डोळे झांकुनि राती । कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥ फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥