भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोजावलिया वोढी

vojavaliya vodhi

वोजावलिया वोढी । वोढी पाडीजे ते नाहीं । ऐसें विचारुनि पाही आपुला मनीं । मग राहिजे सुतत्त्व निर्वाणीं ॥१॥ दुर्लभ दुर्लभ संसार त्यात दुर्लभ माणुसपणा । ये जन्मीं नोळखसी । पशु होउनी जन्मसी । मग तुज सांगेल कवण रया ॥२॥ जंव देहीं आहे देवो तव या वेदे त्याच्या लाह्या । मग तुज रात्री जाईल जडभारी । बापरखुमादेविवरु विठोजी पंढरपुरीं । तो वोळगे वोळगे जन्मवरी ॥३॥