भजनी मालिका
← भजनांकडे परत

वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं

viyog na ghade sannidh vasalen | akhand rahilen hoy chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥ कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें॥२॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥ तुका म्हणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥