भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये

viththalavanchoni bramha jen bolati | vachan ten santin manun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥ विठ्ठलावांचूनि ज्या ज्या उपासना । अवघा चि जाणा सम्रचि तो ॥ध्रु.॥ विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होती जाणा ॥२॥ विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पत्ती वाउगीया ॥३॥ तुका म्हणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥