भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला

viththala viththala | kanth alavitan phutala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥ कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥ तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥