भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ

viththal viththal mantra sopa | kari papa nirmul

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥ भाग्यवंता छंद मनीं । कोड कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥२॥ तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य ॥३॥