भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा

viththal tal viththal dindi | viththal tondin uchchara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥३॥