भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता

viththal muktidata | navhe maro hen bolata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥ सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा॥३॥ अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥ तुका म्हणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥५॥