भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठो सांपडावया हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें

vitho sampadavaya hatin | thavi jhali ek gati | na dharin bhay chittin | bal kiti tayachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठो सांपडावया हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥ एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥ बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥