भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया

vishvavyapi maya | tinen jhakulilen chhaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥ सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥ आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥२॥ तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥