भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव

vishvas to dev | mhanuni dhariyela bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥ माझी वदवितो वाणी । जेणें धरिली धरणी ॥ध्रु.॥ जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीच्या विचारे ॥२॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाठी ॥३॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥ तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥