भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं

vishvas dharuni rahilon nivant | thevuniyan chitta tujhe payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥ न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥ मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥ करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोलें पांडुरंगा ॥४॥