भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळसी सखें वोंगळाची

vishtha bhakshi taya amrut parikhen | vongalasi sakhen vongalachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळसी सखें वोंगळाची ॥१॥ नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥ तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥