भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला

vishayin visar padila nihshesh | angin bramharas thasavala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥